Wednesday, December 17, 2014

स्वर-गंगेची गंगोत्री--कोटला सुल्तानसिंह 

एखादं झाड़ कितीही मोठं,डौलदार,बहारदार असलं,तरी त्याची मुळं नेहमी जमिनी सोबत जोडलेली असतात।झाड़ जेवढं मोठं,तेवढाच त्याच्या मुलांचा विस्तार व खोली मोठी।त्याच प्रमाणे जरी एखादी व्यक्ती आयुष्यात कितीही यशस्वी झाली आणि नावारुपास आली,तरीही ती सदैव आपलं जन्मस्थान व बालपण या सोबत एका निसर्ग नाळेने जोडलेली असते।आणि जर ती व्यक्ती रफ़ी साहेबांच्या दर्जाची असेल तर त्या जन्मस्थानाचं महत्त्व अजूनच वाढून जातं।

रफ़ी साहेबांनी गायलेली असंख्य गाणी आपण सर्वांनीच ऐकलेली आहेत।त्यांच्या साध्या,सरळ स्वभावाचे किस्सेही आपल्याला माहिती आहेत।रफ़ी साहेबांविषयी निश्चितच एक आदरभाव सर्वांच्या मनात आहे.
बरेच वर्ष एक इच्छा मनाला साद घालत होती,रफ़ी साहेबांच्या जन्मस्थळा विषयी जाणून घेण्याची,तिथे भेट देण्याची।आणि अलीकडेच रफ़ी साहेबांच्या जन्मगावी जाण्याचा,तिथल्या वातावरणात मन भरून श्वास घेण्याचा योग ही जुळून आला.हो,अमृतसर जिल्ह्यातल्या त्या छोट्याशा गावाची खरी ओळख 'रफ़ी साहब का गाव' अशीच आहे… कोटला सुल्तानसिंह या नावाचं अस्तित्व रफ़ी साहेबांमुळेच आहे,असं म्हटलं तर 
अतिशयोक्ती ठरणार नाही।

२४ डिसेम्बर १९२४ ला रफ़ी साहेबांचा जन्म झाला।१९३८ पर्यन्त ते आणि त्यांचा परिवार त्या गावात राहत होता.रफींचे वडील एक खानसामा होते. 
१९३८ ला मात्र रफ़ी कुटुंब लाहौरला गेलं।

मजीठा तहसील मधे असलेलं हे सुन्दर गाव(तिथल्या भाषेत त्याला पिण्ड असं म्हणतात) अमृतसर शहराच्या उत्तरेला साधारण पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे. जशी पंजाब मधील एखाद्या खेड्याची व आसपासच्या  परिसराची एक छबि आपल्या मनामधे असते,ते गाव,तो परिसरही त्याला अपवाद नाही।रस्त्याच्या दोन्ही बाजूला मनमोहक शेती,त्यांना फुलवणारे ते कालवे,आपल्या मनाला भुरळ घालतात।कुठेतरी थांबून 'सरसो दा साग,मकई दी रोटी' खाण्याची इच्छा नाही झाली तरच नवल.हे सगळं वाटत असताना मात्र एक प्रचंड उत्सुकता मनात पिंगा घालत होती. रफ़ी नावाच्या स्वर गंगेची ती गंगोत्री कशी असेल हे कुतूहल काहीसं अस्वस्थ करत होतं। त्या विचारात गढ़ता गढ़ता त्या गावात आम्ही आलो सुद्धा।

त्या अनोळखी लोकांच्या चेहऱ्यावरील अभिमानानी(घमेंड नव्हे) आमचं स्वागत केलं।तो अभिमान अर्थातच रफ़ी साहेबांविषयीचा होता,हे वेगळं सांगायला नको. त्यातला एक जण आम्हाला एका वृद्ध व्यक्तीकड़े घेवून गेला।
ती व्यक्ती म्हणजे सरदार गुरबक्श सिंह।रफ़ी साहेब जेव्हा त्या गावात राहत होते,तेव्हा गुरबक्श जी कोटला सुल्तान सिंह चे सरपंच होते। अशा व्यक्तीला भेटणं हे खरोखरच आमचं भाग्य होतं। तेच आम्हाला रफ़ी साहेब जिथे वास्तव्याला होते,त्या ठिकाणी घेवून गेले।माझं मन उत्सुकतेची परिसीमा गाठत होतं। काही क्षणातच आम्ही त्या जागी पोहोचलो।

रफ़ी साहेबांचे जे घर मालक होते,आता त्यांची चौथी पीढ़ी होती।एका जाम्भळाच्या झाडाच्या छायेत असणारी मोकळी जागा त्यांनी दाखवली। तिथेच त्या काळी (१९२४ ते १९३८)रफींचं झोपडीवजा घर होतं।त्या छोट्याश्या जागेत बागडणाऱ्या एका मुलाने,आपल्या सुरांमुळे जग काबिज केलंय आणि आपण स्वत: त्या जागी आहोत,या वर काही क्षण विश्वास बसत नव्हता।त्या जाम्भळाची गोडी रफ़ी साहेबांच्या गळ्यात व स्वभावात तर उतरली नसावी ना,असाही एक विचार मनाला स्पर्श करून गेला। ज्या मातीत रफींचं आयुष्य उमललं,ती माती आपल्या बरोबर न्यावी अशी इच्छा होती।घरमालकांच्या परवानगीने त्या जागेची थोड़ी माती घेतली।आयुष्यभर पूरणारी ती एक आठवण आता माझ्या सोबत होती।

जवळंच रफ़ी साहेबांचे एक वर्गमित्र राहत असल्याचं आम्हाला सांगण्यात आलं.सरदार बक्शीश सिंह हे त्यांचं नाव. त्यांच्या घरी गेलो। बक्शीश सिंह जी रफीच्या आठवणीत रमले।रफ़ी हे अत्यंत शांत व लाजाळु होते।
आम्ही त्यांना 'फीको' म्हणूनच हाक मारत असू,हे ही सांगायला ते विसरले नाहीत।रफींच्या सोबतचे त्यांचे ते जुन्या काळचे फोटो पाहून मजा वाटत होती. रफ़ी कोटला सोडल्यानंतर इच्छा असूनही कधी गावात परत येऊ शकले नाहीत,ही एक छोटीशी खंत त्यांच्या बोलण्यात जाणवत होती।

रफ़ी साहेबांच्या गावात एक फ़क़ीर,पंजाबी सूफी गाणी म्हणत नेहमी यायचा।बाल रफ़ील नेहमीच त्याचं आकर्षण वाटायचं।तो त्या फकीराच्या मागे मागे जायचा आणि त्यानी गायलेली गाणी दिवसभर गुणगुणत राहायचा।गाण्याच्या आवडीचा स्त्रोत म्हणजे तो फकीरच होता,हे स्वत:रफ़ी साहेब अनेकदा सांगायचे।

रफ़ी साहेब ज्या शाळेत शिकले ती शाळा मोठ्या अभिमानानी आज ही उभी आहे. गावातील लोकांनी रफींच्या नावानी एक सभागृह पण बांधले आहे.
असं सांगतात की बालरफ़ीनी एका झाडावर आपलं नाव कोरलं होतं,पण 
कुठल्यातरी अरसिक व्यक्तीची कुऱ्हाड त्यावर चालली आणि ही बहुमुल्य आठवण नष्ट झाली।

रफ़ी साहेब ३१ जुलॆ १९८० ल गेले.केवळ पंचावन्न वर्ष,सात महीने,सात दिवसांचं आयुष्य त्यांना लाभलं।पण त्यांच्या सुरांचा,आठवणींचा झरा रसिकांच्या हृदयात अजूनही प्रवाहीत आहे।रफ़ीच्या आयुष्यबरोबरच या निर्मळ प्रवाहाचंही कोटला सुल्तान सिंह हे उगमस्थान आहे.या सुन्दर गावाची आठवण घेवून अमृतसरकड़े निघालो। ती शाळा,जाम्भळाचं झाड़,भेटलेली माणसं हे सगळं मनात डोकवत होतं।परतीच्या प्रवासात माझ्यातल्या कवीनी मात्र त्या गावाबद्दल शब्द कागदावर उतरवायला सुरवात केली।

बहते बहते हवा अक्सर रुका करती है वहा 
हसीं फूलों की डालियाँ झुका करती है वहा 
मुकाम था कभी जिसका उस फ़रिश्ते की खातिर 
महफ़िल कुल कायनात की सजा करती है वहा.

हैप्पी बर्थडे रफ़ी साहेब।।।।।।

मनीष गोखले 
पुणे 
9822859270 


या जगात वेगळी

क्षणात मना वेढणारी,ती धुक्याची एक साखळी
की ताटव्यात फुलांच्या पहुडलेली नाजुकशी पाकळी
कोण ती अलगद घेवून येते,एक सुगंधी सावली 
असून या जगीचीच का वाटे,ती या जगात वेगळी 

Friday, November 28, 2014

चलो मेरी वफ़ात का सबब तो बन गयी
जो ता-उम्र जीने की दवा न बन सकी
मै तो रोज़ ही बनता रहा बिखरता रहा
पर ये जिंदगी कभी उसके सिवा न बन सकी 

Thursday, November 27, 2014

उम्रभर का फासला

न कोई शिकवा है,न अब और कोई गिला है
मै तो खुश हू,जो भी मुझे जिंदगी से मिला है  
कुछ दर्द है,अश्क़ है और ये आलम ए तनहाई 
है प्यार जिनसे,उनसे उम्रभर का फासला है 

Wednesday, November 19, 2014

...भिजलेले किनारे

शुन्य मनाला या ओल्या पापण्यांचे सहारे
शुष्क समुद्राचे जसे ते भिजलेले किनारे

असतात चटकेच जेव्हा,नशिबी तुमच्या
ठेवताच पाऊल पेटतात,विझलेले निखारे

वादळातही कधी टिकते उभारी मनाची 
कोसळतात कधी सुखातही हे निवारे 

नको साथ कुणाची,हे आयुष्य सावराया 
असू दे असेच आता,या दुःखाचे पसारे 

उभ्या आहेत सभोवताली,या काचभिंती 
जो तो करतो आहे,का हे नि:शब्द इशारे 

कधी पुढे कधी मागे,होतात या सावल्या 
सूर्य का ठरवत असतो "ठाकुर"या दिशा रे 

किसी की खातिर हम इस कदर,मिटते चले गये
के सागर किनारे अपनी दास्तां लिखते चले
कर के हर इक दर्द,उन बेताब मौजो के हवाले
धीरे धीरे में इस बे-दर्द जिंदगी से,उठते चले गए


Monday, November 17, 2014

हुवा करते है

बारहा नजरो में आता है,जो है दिल में बसा हुवां  
वरना इस जहां में कुछ मंजर और भी हुवा करते है 
कश्ती ऐ दिल क्यों आ जाती है अक्सर तुफानो में 
वैसे तो यहाँ खामोश समंदर और भी हुवा करते है 

Friday, November 14, 2014

...पाते है देखे

हर गाम पे है काटो की बस्ती,कहा तक चल पाते है देखे
इस बे-सहारा जिंदगानी में,कब तक सम्हल पाते है देखे 

वो दूर उफक तक है फैला,हुकूमत-ए-जुल्मत का सितम   
उम्मीद की किरनो के काफिले,कब निकल पाते है देखे  

सुना है हर दर पे सुकू,दस्तक दे ही देता है एक दिन 
पैगाम-ए-मसर्रत अब दिल को,कब मिल पाते है देखे

दर-ए-खुदा हो,ये सनमकदा हो या फिर हो ये मैखाना
मुन्तशिर किस्मत के रास्ते,कहा से बदल पाते है देखे

तेरे साथ ही नहीं चलते है आजकल,तेरे ही साये "ठाकुर"
फासले अब ये अनजाने से, कब पिघल पाते है देखे

गाम-पाऊल
उफ़क़ --क्षितिज
ज़ुल्मत --अंधार
मसर्रत --ख़ुशी
मुंतशिर --विस्कटलेला
Sunday, November 9, 2014

घुटमळलो होतो

ओलांडताना तो उंबरठा,मी अडखळलो होतो 
ठेच लागली मनाला अन हळहळलो होतो 
तिच्या आठवणींच्या पायऱ्या उतरता उतरता 
शेवटचं तिला पाहायला मात्र घुटमळलो होतो 

Tuesday, November 4, 2014

...पुन्हा पुन्हा

माझ्याच सावलीत संगत तुझी,शोधतो पुन्हा पुन्हा 
स्पर्शून तुझ्या जाणीवेला,तुज भेटतो पुन्हा पुन्हा 
माझ्या चेहऱ्यात प्रतिबिंब तुझे,दाखवतो आरसा 
तुझ्यासाठीच स्वतः कड़े मी,पाहतो पुन्हा पुन्हा  

Tuesday, October 28, 2014

सुनने आया हूं

फिर कलियां तेरे तबस्सुम की चुनने आया हूं 
इन पलकों के दामन में कुछ पल छुपने आया हूं 
भरी महफ़िल में जो कहते रहे तुम निगाहो से 
इस तन्हाई में वो तेरे लबो से सुनने आया हूं 

...आया हूँ

फ़िर कलियां तेरे तबस्सुम की,चुनने आया हूँ
इन पलकों के दामन में कुछ देर,छुपने आया हूँ 
भरी महफ़िल में जो कहते रहे तुम,निगाहों से
इस तन्हाई में वो तेरे लबो से ,सुनने आया हूँ
Friday, October 24, 2014

जो बात तुझ में है……साहिर लुधियानवी 

ये महलो ये तख्तों ये ताजों की दुनिया
ये इंसा के दुश्मन समाजो की दुनिया
ये दौलत भूखे रवाजो की दुनिया
ये दुनिया अगर मिल भी जाये तो क्या है

हे पैशाच्या जोरावर चालणारं व माणुसकी सोडून वागणारं जग आहे. या जगात आमच्या सारख्या गरिबांना काय मिळणार? हा गुरुदत्तनी विचारलेला परखड सवाल किंवा "हर चीज़ है दौलत वालो की,मुफ़लिस का सहारा दिल ही तो है" हे राज कपूरनी मांडलेलं सत्य,एका तिखट लेखणीतून आलेलं होतं.ती लेखणी ज्याची होती,त्याला आपण एक विद्रोही कवि म्हणूनच ओळखतो।

हो,साहिर लुधियानवी हे त्याचं नाव. या नावा बरोबर सदैव जुळली आहे ती एका वेगळ्या आणि दर्जेदार शायरीची अपेक्षा। साहिर म्हणजेच उर्दू भाषेत जादुगार। शब्दाचा लीलया खेळ करणारा।नुसतच मनोरंजन नाही तर आपल्या शायरीतून  सामाजिक भान जपणाऱ्या साहिरचं खरं नाव अब्दूल हयी आहे. ८ मार्च १९२१ चा त्याचा जन्म पंजाब मधील लुधियानातला। आयुष्याचा खडतरपणा साहिरनी अगदी लहानपणीच पाहिला।त्याच्या आई-वडिलामधे होणाऱ्या सततच्या भांडणांमुळे त्याच्या मनात एक असुरक्षेची भावना निर्माण व्हायला लागली।साहिर जेव्हा अवघा १३ वर्षाचा होता तेव्हा त्याचे आई-वडील विभक्त झाले।साहिर आई सोबत राहू लागला।त्याच्या हयाती मधे त्याने आईची साथ कधीही सोडली नाही।

पुढे साहिरचं शिक्षण लुधियाना आणि लाहौर येथे झालं। शिक्षणापेक्षा साहिरला काव्य प्रतिभाच जास्त साद घालत होती।"तल्ख़ियां" या त्याच्या पहिल्या काव्यसंग्रहानी साहिरला नाव मिळवून दिलं।१९४७ ला देशाची फाळणी झाली,साहिर लाहौर मधेच होता।सवेरा या त्याच्या लेखा मधून त्याने पाकिस्तानी व्यवस्थे विषयी कडवट असं लिखाण केलं।त्याचा परिणाम म्हणून पाकिस्तान सरकारने साहिर विरुद्ध अटक वारंट काढला। शेवटी साहिर पाकिस्तानातून कसाबसा निसटला व दिल्लीला येवून पोहोचला।

मुंबईची मात्र त्याला जबरदस्त ओढ़ होती।मुंबईला माझी गरज आहे असं नेहमी त्याला वाटायचं। स्वताच्या शायरी वर त्याला आत्मविश्वास होता।  मुंबईच्या सीने सृष्टीनेही साहिरला  निराश केलं नाही। आज़ादी की राह पर या चित्रपटसाठी साहिरनं पहिल्यांदा गाणी लिहिली,साल होतं १९४९. पण साहिरचे खरे पारखी ठरले ते संगीतकार सचिन देव बर्मन।नौजवान या चित्रपटसाठी साहिरनी लिहिलेलं "ठंडी हवाये,लहरा के आये" साहिरचं नाव करून गेलं।गुरुदत्त ची नजर साहिर वर पडली।गुरुदत्तच्या बाज़ी मधे त्याने साहिरला मौका दिला।पुढे १९५७ मधे आलेला "प्यासा" मात्र साहिर आणि गुरुदत्तच्या आयुष्यामधे कमाल करून गेला।

गुरुदत्तच्या सोबतच साहिरचे गुण ओळखणारे अजून एक व्यक्ति म्हणजे बी.आर.चोप्रा। चोपरांच्या बहुतांश
चित्रपटांसाठी साहिरनी एक से एक गाणी लिहिली आहेत।गुमराह,वक़्त,हमराज,नया दौर,इन्साफ का तराजू कितीतरी नावं घेता येतील। कुठलाही गाणं घ्या,प्रत्येक गाण्यात साहिर आपली हुकूमत गाजवतोच।संगीतकार रविचाही "नया दौर" वगळता तेवढाच मोलाचा वाटा आहे या यशात।

अजुन एक श्रेष्ठ मिलापाचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे तो म्हणजे रोशनच्या संगीताला साहिरच्या शब्दांची जोड़. बरसात की रात,आरती,ताज महल,भीगी रात,चित्रलेखा हे सगळंच सौंदर्यानी नटलेलं होतं।पण दुर्दैवानी रोशनचं अकाली झालेलं निधन,रसिकांच्या पदरात फार मोती टाकू शकलं नाही।

ओ पी नय्यर(नया दौर,सोने की चिड़िया),ख़य्याम(फिर सुबह होगी,त्रिशूल),लक्ष्मीकांत प्यारेलाल(दाग,इज्जत),राहुल देव बर्मन(बर्निंग ट्रेन,दीवार),राजेश रोशन(कला पत्थर) अशा तमाम संगीतकारांनी साहिरच्या शब्दांना सुरावट दिली आहे.

साहिरच्या विचारसरणीची आणि त्याच्या काव्य श्रेष्ठत्वाची बोलक्या उदाहरणांवरही एक नजर टाकणं
आवश्यक आहे.

वो अफ़साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमक़िन.... गुमराह
कहने की जरूरत नहीं,आना ही बहुत है। … नया दौर
गेसू खुले तो शाम के दिल से धुवा उठे.... आरती
मै तेरे दर पे आया हु। कुछ कर के जाऊंगा। … लैला मजनू
ओ सारे जग के रखवाले,निर्बल को बल देने वाले।  हम दोनों
कौन कहता है के चाहत पे सभी का हक़ है। …ग़ज़ल
रात भर का है मेहमां अँधेरा। .... सोने की चिड़िया
आगे भी जाने ना तू,पीछे भी जाने ना तू। .... हमराज

ताजमहल आणि कभी कभी साठी त्याला फिल्मफेयर पुरस्कार मिळाले।तसेच १९७१ मधे  भारत सरकारने पद्मश्री देवून साहिरच्या कामाचा गौरव केला।

साहिरची प्रेरणा जशी त्याची आई होती,तसंच त्याला न मिळालेली अमृता प्रीतम सतत त्याच्या आयुष्याची घालमेल वाढवत होती होती।अमृता साठी साहिर कायमचा अविवाहीत राहीला।आयुष्यभर ते दोघही एकमेकांवर प्रेम करत राहिले पण कधीच एकत्र येवू शकले नाहीत। प्रेम मिळालं नाही,तेव्हा साहिर व्यसनी होत गेला।धूम्रपानाची अत्याधिक सवय त्याचा हळूहळू घात करत होती।

शेवटी २५ अक्टूबर १९८० ला आपली अफाट अशी शब्द-संपत्ति मागे ठेवून साहिर निघून गेला।रफ़ी साहेब साहिरच्या केवळ तीन महीने आधीच गेले होते. सुरांच्या त्या बादशहाला शब्द कमी पडू नयेत म्हणून की काय
साहिरलाही विधात्यानी बोलावून घेतलं असावं।

उतनाही उपकार समझ,जितना साथ निभा दे..... 
 असं एकमेकांना समजावत,ते शब्द-सुरांचे खजिने अजूनही परमात्म्या समोर उलगडून दाखवत असतील।

साहिरच्या ३४ व्या स्मृतिदिनी आदरांजली।।।।

मनीष गोखले 
पुणे 
९८२२८५९२७० 
      

Monday, October 13, 2014

जीने की दवां

वो जख्म ख़ुशी से है सम्हाले हुवे दिल में 
वज़ूद इनका ही अब मेरे जीने की दवां है 
अक्स उभर आता है किसीका इन दागो में
मेरी खातिर ऐसा नज़ारा अब और कहां है  

दाग… जख़्म
अक्स-प्रतिबिंब 

Friday, October 10, 2014

देखी ज़माने की यारी,,,गुरुदत्त।

गुरुदत्त म्हटलं की लगेच त्याची ती फाटकी शाल गुंडाळलेली अंधुकशी आकृती आठवते अर्थातच "प्यासा" मधली।ये दुनिया अगर मिल भी जाये तो क्या है? असा त्याने केलेला सवाल आपल्या मनाला अन्तर्मुख करायला लावतो।ते शब्द साहिर चे असतात,तो आवाज़ रफीचा असतो,पण आपल्या समोर गुरुदत्तच असतो. 

केवळ ३९ वर्षाचे आयुष्य जगलेला वसंत कुमार शिवशंकर पादुकोण हा कलावंत,आपल्या मनाचा ठाव घेणाऱ्या प्रत्येक कलाकृति मधून आपल्याला भेटतो,अगदी त्याच्या आयुष्या पेक्षाही त्याच्या जाण्याला 
अधिक वर्ष झाली असली तरीही।

हो,आज १० ऑक्टोबर ला गुरुदत्तच्या जाण्याला ५० वर्ष पूर्ण होत आहेत. प्यासा च्या बरोबरच आर-पार,मि एंड मि ५५,CID,कागज़ के फूल,बाज़,बहारे फिर भी आयेगी,चौदहवी का चाँद असे किती तरी अजरामर चित्रपट तो आपल्या मागे ठेवून गेलाय।

गीता,वहीदा ही दोन प्रश्नचिन्ह कायम त्याच्या मनाची ओढाताण करत राहिली।आणि जेव्हा ते असह्य झालं,तेव्हा आपल्या मृत्यू बाबतचं अजुन एक प्रश्नचिन्ह निर्माण करून तो निघून गेला। 

भरोसा मधे गुरु ची हतबलता शक़ीलनं अचुक मांडली आहे 

इक मोहब्बत के सिवा और न कुछ माँगा था 
क्या करे ज़माने को ये भी गवारा ना हुवा 

५० व्या पुण्यतिथी निमित्त गुरुदत्तला श्रद्धांजली।।।।।।।

मनीष गोखले 
पुणे Monday, October 6, 2014

...गेलो आहे

आयुष्य स्वताचे मी केव्हाच उधळून गेलो आहे 
किती हलकेच तुझ्या मधे मिसळून गेलो आहे 
दाट स्वप्नांच्या या धुक्याशी असा खेळताना 
तुझ्या मखमली जाणीवेत हुरळून गेलो आहे   

Thursday, September 25, 2014

बेनाम सी है

एक मंजिल मेरी नज़र में गुमनाम सी है
और ये रहगुजर भी कुछ बदनाम सी है
दिल के शीशे में तो है ये अक्स किसीका
कहानी ऐ दिल मगर कुछ बेनाम सी है

दिल ऐ नादान

हाल ऐ दिल सुनाऊ उसको,इतना ही तो अरमान था 
मेरे बिगड़े मुक़द्दर में लेकिन,ये भी कहा आसान था
नाजुक थी इस दिल से भी,मेरे दिल की तमन्नायें 
और तमन्नाओ में उलझा हुवा,ये दिल ऐ नादान था  

Monday, September 22, 2014

इंतख्वाब

इश्क़ ने सीखा दिया हमे मजबूर होना भी
कितना हसीन है कभी खुद से दूर होना भी
है नाज़ मुझे  इस बेमिसाल इंतख्वाब पे
मेरा तो लाजमी है खुद पे गुरूर होना भी

इंतख्वाब--निवडWednesday, September 17, 2014

...लगा है कोई

शहर-ऐ-दिल में आ कर बसने लगा है कोई
क्यों मेरे ख्वाबो में अक्सर रुकने लगा है कोई 

ढूंढ रही थी उम्रभर मेरी बेताबियाँ जिसको
खुद ही आ कर धड़कनो में छुपने लगा है कोई

खामोशियो का भी गम नहीं मुझ दीवाने को
आखो से आकर बात जब करने लगा है कोई

सुकू पाता है मीठे जख्मो से ये दिल-ऐ-नाजुक 
तीर-ऐ-हुस्न ले कर जब चुभने लगा है कोई

आ के ज़रा देख तो सनम अपनी दहलीज़ पर 
के तेरी इबादत की खातिर झुकने लगा है कोई 

यु न छुप सकेगी अब ये आतिश-ऐ-दिल 'ठाकुर'
धुवाँ सा तेरे सीने से आखिर उठने लगा है कोई 

Thursday, September 4, 2014

...बने के न बने

ये गम नहीं है, के अब बात बने के न बने 
है तेरी आरजू ही काफी,मेरे जीने के लिये 
ये दुवा है के आये मौत भी,इसी बेखुदी में 
के फिर लौट आउ कभी,तुम्हे पाने के लिये 

Monday, September 1, 2014

...चाहूल

अजून नाही पाहीलं आहे गं मी तुला
पण माझं मन तुला स्पर्श करून आलय
तुझ्या त्या उडणाऱ्या केसांशी खेळून
स्वप्नांची ओंजळ केव्हाच भरून आलय

आता एक एक स्वप्न उराशी बाळगून
तुझ्याच नावानं पडतय गं हे पाऊल
तुझ्या मनातल्या परागकणांना देखील
नव्या सुगंधाची लागली असेल चाहूल


 

अशक्य

अशक्य असं कधी नव्हतच काही
पण तरीही मन हे मारावच लागलं
आवर शक्य त्या अशक्याला घालून
अर्धपोटी मला असं उठावच लागलं 

Sunday, August 31, 2014

चुरा रही हो

 कहा से आई हो,ये जुल्फ की छाव ले कर 
मेरी हर शाम क्यों इतनी महका रही हो 
मै तो हु दीवाना अपनी ही मंजिल का 
क्यों धीरे धीरे मुझको मुझसे चुरा रही हो द्वंद्व

द्वेष आणि स्वार्थ यांचे हे द्वंद्व
प्रेम पाहत असते हताशेपोटी
जागा माझी आहे तरी कुठे इथे
कोणी का नाही भांडत माझ्यासाठी 

Thursday, August 28, 2014

प्रतिबिम्ब तुझे

तुज स्पर्शाने खुललेली ती पाकळी पाकळी 
आठवते मज़ ते लाजणे,अन मन चिंब तुझे 
आज क्षितिजावर शोधतो मी माझे जग ते 
अन ओंजळीतल्या अश्रूंमधे प्रतिबिम्ब तुझे Wednesday, August 27, 2014

मनपाखरू माझे

नभी लागले उडू मनपाखरू माझे 
आठवणीत तिच्या वेडे हे उसासे 
स्वस्पर्षातही होतो आभास तिचा 
भान  कुठले आता मलाच माझे 

२७ ऑगस्ट

दिल जलता है तो जलने दे,आँसू न बहा फ़रियाद न कर। … पासून तर मै पल दो पल का शायर हूँ पर्यन्त
आपला प्रवास करणारे श्रेष्ठ गायक मुकेश यांचा आज ३८ वा स्मृतिदिन।

ओह रे ताल मिले नदी के जल में,नदी मिले सागर में,सागर मिले कौनसे जल में,कोई जाने ना.।
शैलेन्द्र नी लिहिलेले हे वास्तव मुकेश च्या आवाजात अजुन समर्पक वाटतं। …आणि खरच मुकेश नावाचा तो समुद्र आपल्या आयुष्यात कसा बे-मालूम पणे मिसळून गेला आहे याचं ही आपल्याला भान उरत नाही।

मुकेश चन्द्र माथुर यांना अभिवादन

Tuesday, August 26, 2014

बता नहीं सकता

क्या करू मै उसे यु ही भुला नहीं सकता 
अपने जज्बात लेकिन छुपा नहीं सकता 
मेरी बेताबीयो ने तो माना उसे है अपना  
रूबरू मगर उसको ये बता नहीं सकता 

Tuesday, July 22, 2014

...समाया जाता है

माना के बोझ है,पर ख़ुशी से ये भी उठाया जाता है 
इश्क़ वो इक दांव है,जो ज़िंदगी पे लगाया जाता है 
आपही मिटने लगती है हस्ती,मुद्दतों सम्हाली हुवी 
चुपके से जब इक अजनबी,रूह में समाया जाता है 

@ मनिष गोखले... 

Wednesday, July 9, 2014

...रहा हूँ आजकल

नाम-ए-उल्फत के बहाने दिल को सता रहा हूँ आजकल 
किसी की खातिर मैं खुद को ही भूला रहा हूँ  आजकल 
इश्क़ किया तो जाना के दर्द की सिवा कुछ भी नहीं 
बड़ी ख़ुशी से लेकिन ये गम उठा रहा हूँ आजकल 

Friday, July 4, 2014

...बिखरा गयी वों

मेरी नजर-ए-शौक से हाय शरमा गयी वों  
न जाने अपने आँचल को यु लहरा गयीं वों 
मै चश्म-दीद बना जो उसकी धड़कनो का 
मानो हजारो कलियाँ फज़ा में बिखरा गयी वों 

Tuesday, June 24, 2014

... हो जाये

कभी मिलेंगे अजनबी बनके,शायद नयी पहचान हो जाये 
यु तो है ये घड़िया मुश्किलो भरी,कुछ आसान हो जाये 
नए आसमान में ढूंढ लेंगे मिल के अब नया सितारा कोई 
क्या जाने किस्मत हम पे फिर से मेहरबान हो जाये 

Monday, June 23, 2014

...मंजूर नहीं

किसी गुजरे हुवे वक़्त की तरह,यु बीतना मंजूर नहीं 
अगर तुम हार जाओ,तो भी मुझे जीतना मंजूर नहीं  
हमसफर हो तो एक मंजिल है अपनी,एक ही रास्ता 
यु किसी और मक़ाम पे तुम्हे,अब मिलना मंजूर नहीं 

Friday, June 20, 2014

...ढलते है

बड़ी मुश्किल से ये कदम मिलते है,
कभी कभी तो लोग साथ चलते है 
वर्ना कभी तो कतराते है साये भी 
जब शाम से पहले ही दिन ढलते है 

Tuesday, June 10, 2014

न जिन्दा रही न मर गयी,कहानी-ए-दिल यर्गमाल हो गयी 
आरजू-ए-बेहतरी में अक्सर,अपने ही पैरो से पामाल हो गयी 
ज़ेर-ए-तामीर फिर भी रखे हमने,इन उम्मीदों के आशियाने 
हर कोशिश-ए-तामीरी मगर,आप ही शिकस्ता हाल हो गयी 

यर्गमाल --ओलीस राहने
पामाल--पायदळी तुडवणे
ज़ेर-ए-तामीर--Under Construction
Monday, June 9, 2014

...बदल गया हूँ

दर्द उठाना लिखा था,दर्द में ढल गया हूँ 
अब तो आंसू भी नहीं आते,इतना बदल गया हूँ 
मुझको आवाज़ न देना मेरे हमनशीनो 
मै न मिलूंगा अब कभी,आगे निकल गया हूँ 

Monday, June 2, 2014

...मिलाना भी है

तुमसे खफा भी हूँ और तुमको मनाना भी है 
ये अन-चाहा बोज़ अब मुझको उठाना भी है 
दिल अब भी नहीं मानता तेरी इस जुदाई को 
एक बार तुमसे मिलके,खुद से मिलाना भी है 

Saturday, May 31, 2014

...किसका ये गुनाह है

क्या पता किसकी खता है,किसका ये गुनाह है 
सच तो ये है के आज दिल मुकम्मल तबाह है 
गुजरते हुवे वक़्त ने छीन लिया है मुझसे उनको 
धुंधलाते उनके सायो पे अब भी मेरी निगाह है 

Wednesday, May 28, 2014

....तेरी मजबूरीयों का

बेवफा तुझको भी कहु कैसे,मुझे अहसास तेरी मजबूरीयों का
प्यार किया है तुमसे तो,मुझे भी पता है मेरी कमजोरियों का 
आसान नहीं है फिर भी ये जानना के अब साथ नहीं है अपना 
नजर आ रहा है मुझको वो मंजर जिंदगी की दुश्वारियों का 
Tuesday, May 27, 2014

...जिंदगानी नहीं है

क्या करे साथ तेरे अब और ये जिंदगानी नहीं है 
मेरी नजर में फिर भी तेरा कोई सानी  नहीं है
तेरा तसव्वुर तेरी आरज़ू तो है आज भी मुझको 
है एक सोज़ दिल में मगर आखो में पानी नहीं है 


Monday, May 19, 2014

...बताया है

कुछ जला के बुझाया है,कुछ बुझा के जलाया है
हमने हक़ जिंदगी से कुछ इस कदर जताया है
औरो की बेवफाई को अक्सर अपने सर पे उठाके 
अपने आप को इस जमाने में बेवफा बताया है 

Thursday, May 15, 2014

...है कोई

मुझ को मुझ से आजकल चुरा लेता है कोई 
मैं खो जाता हूँ,मुझ को छुपा लेता है कोई 
कोशिश है इस जमी पे ही रहू दिल थामे हुवे 
पर आसमा तक मुझको उठा लेता है कोई 


Wednesday, May 14, 2014

...के बाद

सोचता हूँ के कितनी बार लिया होगा मैने नाम तुम्हारा 
शायद उतना ही,जितनी साँसे जीया हू तुम्हे चाहने के बाद 
और क्या जुस्तजू रही होगी,मेरी इन तरसती निगाहो को 
और भला क्या देखना चाहेगी वो बेचारी,तुम्हे देखने के बाद 

Monday, May 12, 2014

ऐसा भी हो सकता है?

मै कुछ कहूँ और तुम खामोश रहो,क़ोई ताल्लुक ऐसा भी हो सकता है? 
मै पलके बिछउ और तुम न आओ,कोई तक़ल्लुफ़ ऐसा भी हो सकता है? 

Thursday, May 8, 2014

...हो जाउ

तेरा खयाल न करू तो इस दिल का मुज़रिम हो जाउ  
तेरे खयालो मे रहू,तो दर्द ओ गम मे तक़सीम हो जाउ  
तू ही बता दे अब के कैसे निभाउ मै ये मोहब्बत तेरी 
तू कहे तो जी लू,ना कहे तो जिन्दगी से यतीम हो जाउ 

Tuesday, April 29, 2014

...इंतजार तेरा

खुली पलक मे तेरी ज़ुस्तज़ु,बन्द पलको मे दींदार तेरा 
ला-इलाज अब तो है मर्ज़ ये,मै तो हु एक बीमार तेरा 
जगा देँगी ये तडप मेरी,मेरा सोया हुवा मुक़द्दर भी 
तह -ऐ-रूह मे सुलगता है,न जाने कब से इंतजार तेरा 

Wednesday, April 16, 2014

...न छोड़ सकूंगा

छोड़ दूंगा ये दुनिया,पर ये ख्वाब न छोड़ सकूंगा 
वो इबादत है मेरी,मै  ये सवाब न छोड़ सकूंगा
तड़प है सुकु है फिर भी,के है प्यार मुझे उस से 
है कसम उसकी,मै ये इंतख्वाब न छोड़ सकूंगा 

Wednesday, April 2, 2014

...सिलसिला तो देखिये

इन्तेख्वाब मंज़िल ऐ उफक का,मेरा ये हौसला तो देखिये 
रहू जमी पर और छू लू आसमा,मेरा ये फैसला तो देखिये 
माना होंगे काटे हर राह में,मगर है कुछ मजा इसमें भी
अब न रुकुंगा कही,अपनी ज़िद का ये सिलसिला तो देखिये   


उफक---क्षितिज 

Monday, March 31, 2014

...न दिया

खामोश रखा जुबा को,और अश्क़ो को बहने न दिया 
जला आतिश ऐ उल्फत में,और धुवे को उठने न दिया 
खबर मेरी दीवानगी की फिर भी चली इस ज़माने को 
मेरी आखो ने भेद खोला,मैंने तो लाख खुलने न दिया Thursday, February 27, 2014

.....उसने

कुछ इन्किशाफ़ ये भी हुवा,जो यु नजर मिलायी उसने
एक आरजू उधर भी पायी,एक आग सी लगायी उसने 
अल्फाज़ न मिल सके उस झिझक को तो क्या हुवा 
आ के जहान ए तसव्वुर में हर एक दुरी मिटाई उसने 

इन्किशाफ़--राज़ खुल जाना