शुन्य मनाला या ओल्या पापण्यांचे सहारे
शुष्क समुद्राचे जसे ते भिजलेले किनारे
असतात चटकेच जेव्हा,नशिबी तुमच्या
ठेवताच पाऊल पेटतात,विझलेले निखारे
वादळातही कधी टिकते उभारी मनाची
कोसळतात कधी सुखातही हे निवारे
नको साथ कुणाची,हे आयुष्य सावराया
असू दे असेच आता,या दुःखाचे पसारे
उभ्या आहेत सभोवताली,या काचभिंती
जो तो करतो आहे,का हे नि:शब्द इशारे
कधी पुढे कधी मागे,होतात या सावल्या
सूर्य का ठरवत असतो "ठाकुर"या दिशा रे
शुष्क समुद्राचे जसे ते भिजलेले किनारे
असतात चटकेच जेव्हा,नशिबी तुमच्या
ठेवताच पाऊल पेटतात,विझलेले निखारे
वादळातही कधी टिकते उभारी मनाची
कोसळतात कधी सुखातही हे निवारे
नको साथ कुणाची,हे आयुष्य सावराया
असू दे असेच आता,या दुःखाचे पसारे
उभ्या आहेत सभोवताली,या काचभिंती
जो तो करतो आहे,का हे नि:शब्द इशारे
कधी पुढे कधी मागे,होतात या सावल्या
सूर्य का ठरवत असतो "ठाकुर"या दिशा रे
No comments:
Post a Comment