Friday, October 10, 2014

देखी ज़माने की यारी,,,गुरुदत्त।

गुरुदत्त म्हटलं की लगेच त्याची ती फाटकी शाल गुंडाळलेली अंधुकशी आकृती आठवते अर्थातच "प्यासा" मधली।ये दुनिया अगर मिल भी जाये तो क्या है? असा त्याने केलेला सवाल आपल्या मनाला अन्तर्मुख करायला लावतो।ते शब्द साहिर चे असतात,तो आवाज़ रफीचा असतो,पण आपल्या समोर गुरुदत्तच असतो. 

केवळ ३९ वर्षाचे आयुष्य जगलेला वसंत कुमार शिवशंकर पादुकोण हा कलावंत,आपल्या मनाचा ठाव घेणाऱ्या प्रत्येक कलाकृति मधून आपल्याला भेटतो,अगदी त्याच्या आयुष्या पेक्षाही त्याच्या जाण्याला 
अधिक वर्ष झाली असली तरीही।

हो,आज १० ऑक्टोबर ला गुरुदत्तच्या जाण्याला ५० वर्ष पूर्ण होत आहेत. प्यासा च्या बरोबरच आर-पार,मि एंड मि ५५,CID,कागज़ के फूल,बाज़,बहारे फिर भी आयेगी,चौदहवी का चाँद असे किती तरी अजरामर चित्रपट तो आपल्या मागे ठेवून गेलाय।

गीता,वहीदा ही दोन प्रश्नचिन्ह कायम त्याच्या मनाची ओढाताण करत राहिली।आणि जेव्हा ते असह्य झालं,तेव्हा आपल्या मृत्यू बाबतचं अजुन एक प्रश्नचिन्ह निर्माण करून तो निघून गेला। 

भरोसा मधे गुरु ची हतबलता शक़ीलनं अचुक मांडली आहे 

इक मोहब्बत के सिवा और न कुछ माँगा था 
क्या करे ज़माने को ये भी गवारा ना हुवा 

५० व्या पुण्यतिथी निमित्त गुरुदत्तला श्रद्धांजली।।।।।।।

मनीष गोखले 
पुणे 



No comments: