//sai//
नाव : हर्षित अभिराज
व्यवसाय : संगीतकार , पार्श्वगायक . गीतकार , रंगमंचीय गायक कलाकार , संगीत समुपदेशक
हर्षित नि स्वरबद्ध केलेली लोकप्रिय गीते : दूरच्या रानात केळीच्या बनात , सोडा राया नाद खुळा , बाप्पा मोरया , माझी मुलगी , मैनेची हवा ,आई तुझा गोंधळ मांडिला, चितेसारखे जाळ मला , लहरत लहरत , जीव तुटतो मैतरा , ,मला लागलय सोळावं साल , भूपाळी खंडोबाची .
संगीतकार , गायक , गीतकार म्हणून योगदान दिलेल्या भाषा : मराठी , हिंदी , संस्कृत ,अर्धमागधी ( पाली )
हर्षित च्या चालींना आपला आवाज दिलेले गायक : डॉ . एस पी बालसुब्रमण्यम ( निशिगंध हा डॉ . एस पी बालसुब्रमण्यम यांच्या आवाजातील पहिला मराठीतील प्रकाशित अल्बम आहे ) , हरिहरन , कैलाश खेर , जावेद अली , अनुराधा पौडवाल , सुरेश वाडकर , साधना सरगम , आनंद शिंदे , वैशाली सामंत , परुपल्ली रंगनाथ , रवींद्र साठे, उत्तरा केळकर , वैशाली माडे , जान्हवी प्रभू अरोरा , मुग्धा वैशंपायन , अर्चना आणि प्रार्थना ( ज्यु . बेंगलोर सिस्टर्स ) , अभिलाषा चेल्लम , अनुपमा ,
संगीतकार म्हणून पुढील कवी आणि गीतकारांबरोबर हर्षित नि काम केले / त्यांच्या शब्दांना स्वरबद्ध केले : ना धो , महानोर , शांता शेळके , सुरेश भट , गंगाधर महाम्बरे , मा दा देवकाते , इलाही जमादार , प्रदीप निफाडकर , वैभव जोशी , गुरु ठाकूर , जगदीश पिंगळे ,
प्रसाद कुलकर्णी , राजेंद्र भोसले , रवी पाईक
शाहीर सगनभाऊ आणि पारंपारिक
हर्षित नी गायलेली लोकप्रिय गीते : माझी मुलगी , बाप्पा मोरया ( कैलाश खेर यांच्या सोबत ) , आई तुझं गोंधळ मांडिला ( आनंद शिंदे यांच्या सोबत ), मैनेची हवा ,पंढरीशी राई , जननी जन्मभूमी , हे वंदन तुला भारत माते , चितेसारखे जाळ मला , भक्तामर स्तोत्रम ,
हर्षितनी ज्या चित्रपटांसाठी साठी संगीतकार / पार्श्वगायक म्हणून काम केलंय ते चित्रपट :-
१. मास्तर एके मास्तर : कला. - अशोक सराफ , मंगेश देसाई , दीपाली सय्यद , सुरेखा कुडची
२. अंगारकी : कला . धर्मेश ( डी आय डी फेम ) मकरंद अनासपुरे , तेजस्विनी पंडित
३. आंदोलन : कला . मिलिंद गवळी , निशा परुळेकर , आण्णा हजारे
४. वर्तमान : कला. सुबोध भावे , मंगेश देसाई ,तेजस्विनी पंडित
५. डोंबारी : कला. मिलिंद शिंदे , हेमांगी कवी , मधु कांबीकर ६. हिच्यासाठी काय पण : निर्मिती सावंत , मंगेश देसाई , भार्गवी चिरमुले
७. महिमा खंडोबाचा : कला . मधु कांबीकर , मिलिंद गवळी , दीपाली सय्यद
८. ज्योतिबा सावंत : स्वप्नील राजशेखर ९. जय जय रघुवीर समर्थ : कला.प्रसाद पंडित , विजय पटवर्धन
१०. कर्तबगार : मधु कांबीकर
११. काळूबाई भक्त धावजी पाटील : मोहन जोशी , मिलिंद गुणाजी , भरत जाधव
हर्षित नी ज्या अल्बम्स साठी संगीतकार / गायक म्हणून काम केलंय ते अल्बम :
१. दूरच्या रानात केळीच्या रानात
२. निशिगंध
३. माझी मुलगी
४, नकोशी
५. भूपाळी आणि कथा खंडोबाची
६. भक्तामर स्तोत्रम
७. नकोशी
८. ओम नमो भगवते वासुदेवाय
९. जय जय महावीरा
१०. या ल्युब्ल्यू ( हिंदी / रशियन )
११. गाता गाता शिकू
१२. नवकार महामंत्र
१३. कथा खंडोबाची
१४. नवनाथ मंत्र
१५ . मंत्र संग्रह
१६. स्तीत्र संग्रह ( पार्श्वनाथ )
मान्यवरांनी केलेले कौतुक : या क्षेत्रात काम करताना हर्षित च्या चालींचे , गायकीचे अनेक मान्यवरांनी कौतुक केलंय त्यात प्रसिद्ध गायक डॉ . डॉ . एस पी बालसुब्रमण्यम , कविवर्य ना. धो. महानोर , संगीतकार पं . हृदयनाथ मंगेशकर , अनुराधा पौडवाल , मंगेश तेंडूलकर ,
गंगाधर महाम्बरे , हरिहरन , रवींद्र जैन
रंगमंचीय सादरीकरण : आज पावेतो ४९० वेळा हर्षित नी रंगमंचावर आपली कला सादर केलीय यात रुणुझुणु वारा रिमझिम धारा , दूरच्या रानात - एक सुरेल सफर , आम्ही दोघे , नातं तुझं माझं , हे सांगितिक कार्यक्रम महाराष्ट्रात आणि महाराष्ट्र बाहेर तेलंगाना , मध्य प्रदेश , कर्नाटक येथेही यशस्वी पणे सादर झाले आहेत
हर्षित च्या आवाजाची ठळक वैशिष्ठ्ये : पार्श्वगायक/ गायक म्हणून काम करताना हर्षित नी भावगीत , भक्ती गीत , गोंधळ , रॉक , प्रेम गीत , असे अनेक प्रकार
हाताळलेत . खर्ज , मध्य , आणि तर या तिन्ही सप्तकात आवाज सहज पणे फिरतो . "तेजज्ञान फौन्डेशन " आणि इतर काही संस्थांसाठी हर्षित नी आपला आवाज त्यांच्या " ऑडीओ बुक " साठी दिलाय ,अमेक जाहिराती जिंगल्स या मध्येही नि आपले योगदान दिलय . हर्षित च्या आवाजातील खालील काही गाणी या वैविध्याचा दाखला देतात :
१. माझी मुलगी : मृदू आणि भावनिक
२. पंढरीशी राई : भक्ती आणि लोकगीताचा भाव एकत्र असणारे गीत
३. आई तुझं गोंधळ मांडिला : लोकसंगीत
४. मैनेची हवा : मराठी लोकगीत , कव्वाली , आणि फिल्मी बाज यांचा संगम
५.हे वंदन तुला भारतमाते : देशभक्तीपर गीत
६. बाप्पा मोरया : संस्कृत मंत्रोच्चारण ( भक्ती )
७. आज इथ उद्या तिथ : लोकसंगीत आणि मृदू भाव यांचा मेळ
८. जय जय महावीर स्वामी : भक्ती , भाव आणि जोश यांचा संगम
९. भक्तामर स्तोत्रम ( संस्कृत ) : दक्षिण , आणि उत्तर यांचा मिलाफ ( संस्कृत आणि पाली भाषे वर आधारित )
१०. आंदोलन मातृभूमीसाठी : मृदू आणि रॉक यांचा मेळ
११. जाऊ या खंडोबाला जाऊ या : गीत एक रंग अनेक
१२. वौईस ओव्हर ( निवेदन आणि निरुपण ) : प्रेरणादायी ऑडीओ बुक्स - "तेजज्ञान फौन्डेशन " आणि जाहिरात ई. कामांसाठी
संगीत परीक्षक ( जूरी ) : रेडीओ मिर्ची 98.3 च्या " मिर्ची म्युझिक अवार्ड " साठी परीक्षक म्हणून गेली ३ वर्षे सतत कार्यरत , त्याच प्रमाणे ईतर अनेक स्पर्धांसाठी
परीक्षक म्हणून काम केलंय
सामाजिक उपक्रम : १. " युनिसेफ " च्या "महिला सबलीकरण आणि मुलगी वाचवा " उपक्रमासाठी गायक संगीतकार म्हणून काम केलंय
२. "दैनिक सकाळ " च्या उपक्रमासाठी सांगितिक योगदान :- १. स्वच्छं पुणे , हरित पुणे
२. मुठा नदी परिक्रमा
३. तनिष्का / मधुरांगण - स्त्री शक्तीला सलाम
४. सकाळ सोशल फौन्डेशन - मातृ दिन सोहळा
५. इको फ्रेंडली गणेश फेस्टिव्हल
३. वौईस ओव्हर ( निवेदन आणि निरुपण ) : प्रेरणादायी ऑडीओ बुक्स - "तेजज्ञान फौन्डेशन "
४. व्हिजन इंडिया २०२० - सांगितिक कार्यक्रम डॉ ए. पी . जे अब्दुल कलम यांच्या विचारांवर आधारित
५. समाजायील विशेष गायक कलाकारांसाठी कार्यशाळांचे आयोजन .
६. ग्रीन एफ एम नारी सन्मान सोहळा
७. भारती विद्यापीठ च्या अनेक सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमात तसेच "अभिजित दादा कदम मेमोरियल फौन्डेशन" च्या सामाजिक
उपक्रमांसाठी गीतकार , गायक आणि संगीतकार म्हणून सहभाग
८. " स्त्री भरून हत्या " या ज्वलंत विषयावर भाष्य करणाऱ्या " नकोशी " , माझी मुलगी " या अल्बम साठी योगदान
हर्षित अभिराज टी व्ही चेनेल मध्ये : १. स्वच्छ पुणे हरित पुणे - दै सकाळ - विशेष प्रसारण - साम वाहिनी
२ . ई टी व्ही ( आता कलर्स ) च्या "नाद खुळा " या "मेगा शो" साठी संगीतकार म्हणून योगदान
३ . ए बी पी माझा ( हर्षित अभिराज - एक संगीत प्रवास ) विशेष कार्यक्रम
४. क्लोज अप M2 G2 - विथ वर्षा उसगावकर - सांगितिक प्रवास
५. नवज्योती सह्याद्री - विथ युनिसेफ - महिला सबलीकरण विशेष कार्यक्रम
६. सर अब्दुल कलाम को सलाम - झी २४ तास विशेष गीत सादरीकरण
या शिवाय हर्षित ची " सोडा राया नाद खुळा , दूरच्या रानात केळीच्या बनात , माझी मुलगी , बाप्पा मोरया हि गाणी झी ( मराठी / हिंदी ) टी व्ही , कलर्स आणि ईतर वाहिन्यांवर सादर होतात
नवीन गायकांसाठी कार्यशाळा आणि सराव कार्यक्रम : " आपले ज्ञान आणि कला याला व्यावसायिक दिशा देण्यासाठी या क्षेत्रात येणाऱ्या नव्या गायकांसाठी , तसेच समाजातील विशेष गायकांसाठी खास कार्यशाळांचे आयोजन. . ज्यांच्याकडे गायन कला आहे पण ती सादर करण्यासाठी आत्मविश्वास आणि व्यावसायिकतेचा अभाव आहे अशा गायकांसाठी विशेष मार्गदर्शन करणारा ओंकार आणि योग वर आधारित सहज सुलभ सराव अभ्यासक्रम तयार केला आहे . बहिणाबाई चौधरी ट्रस्ट , ममता अंध अनाथ संस्था , भारती विद्यापीठ आणि इतर अनेक सेवाभावी आणि शैक्षणिक संस्थांसाठी अशा शिबीर आणि कार्य शाळांचे आयोजन केले
आताच्या प्रसिद्ध गायिका जान्हवी प्रभू अरोरा ( महिमा खंडोबाचा ) आणि अभिलाषा चेल्लम ( डोंबारी ) यांनी त्यांच्या आयुष्यातील फिल्म साठी चे पहिले पार्श्वगायन हर्षित अभिराज यांच्यासाठी केलंय ,
पुरस्कार : - उत्कृष्ठ संगीतासाठी चित्र परिवाराचा पुरस्कार " नकोशी " या अल्बमला मिळाला . अभिजित दादा कदम फौन्डेशन चा " विशेष गीतकार आणि संगीतकार " पुरस्कार , राजेश खन्ना स्मृती पुरस्कार , राजा गोसावी स्मृती पुरस्कार , अशा विविध पुरस्कारांनी हर्षित अभिराज चा गौरव झाला आहे