Friday, February 6, 2015

Society of Indian Record Collectors (SIRC-Mumbai) च्या अमरावती शाखे तर्फे दरवर्षी एक कार्यशाळा 
आयोजित होते।नुकतीच ती ३१ जानेवारी व १ फेब्रुवारी ला अमरावतीच्या विनायक सभागृहात संपन्न झाली।
'भूले बिसरे गीतकार' या वेळी असा विषय होता।

गीतकार म्हटलं की नेहमी आपल्याला लगेच साहिर,शकील,हसरत,मजरूह ,शैलेन्द्र ही नावं आठवतात।पण त्या पलीकडे किमान २०० च्या वर गीतकारांनी या चित्रपट सृष्टीतील सुवर्ण काळाला आपलं योगदान दिलं आहे. काही नावं कदाचित आपण ऐकलेली सुद्धा नसतात।काही वेळेला गाणं आठवत असतं पण त्या मागे मेहनत घेणारे माहित नसतात।आपल्या कलेला योग्य तो न्याय मिळावा,अशी प्रत्येक कलाकराची इच्छा असते।म्हणूनच SIRC अमरावती कडून हा प्रयत्न होता। एकूण ५० गीतकारांची निवड करण्यात आली.
वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेल्या लोकांना बोलण्याची संधी होती। एका गीतकरावर मी पण आपले विचार मांडले।

त्या गीतकराविषयी सांगण्या आधी एक किस्सा सांगतो।बरोबर ९ वर्षापूर्वी,३१ जानेवारी आणि १ फेब्रुवारी २००६ ची ती मध्यरात्र होती।पुण्याच्या यशवंतराव मधे स्वत:संगीतकार ओ पी नय्यर यांच्या उपस्थितीत एक शानदार कार्यक्रम होवू घातला होता। मी प्रथमच नय्यर साहेबांना पाहत होतं।काहीही करून मध्यंतराच्या वेळेत त्यांना भेटायचं,असा हट्ट स्वताशीच केला होता. प्रयत्न सफलही झाला। केवळ दोनच लोकांना त्यांना भेटण्याची परवानगी मिळाली।त्यापैकी एक नशीबवान मी होतो।त्या VIP रूम मधे ५ मिनिटे का होईना,त्यांना भेटलो।

रफ़ी साहब ने गाया हुवा आपका पसंदीदा गीत कौनसा है?या प्रश्नावर त्यांनी दिलेलं उत्तर फार छान होतं।ते म्हणाले,रफ़ी साहब तो हर एक गीत बहोत अच्छी तरह से गाते ही है.लेकिन इस गीत को जिस तरह से लिखा गया है,मै उस से बहोत मुतासिर हुवा हूँ. ये गीत शेवन रिझवी साहब लिखा है. इस गीत के जो अल्फ़ाज़ है,वो एक ऐसा असर पैदा करते है के आप की आखे नम हो जाती है.

वक़्त इंसान पे ऐसा भी कभी आता है 
राह में छोड़ के साया भी चला जाता है 
दिन भी निकलेगा कभी रात के आने पे न जा 
मेरी नजरो की तरफ देख,ज़माने पे न जा 
(हमसाया --१९६८)

हाच धागा पकडून अमरावती मधे गीतकार शेवन रिझवी यांच्या वर बोललो।
नय्यर यांच्या बरोबर त्यांनी एकूण १० चित्रपट केले।फ़क्त २२ गाणी लिहिलीत।पण प्रत्येक गाणं हे मोत्यासारखं आहे. बसंत,एक मुसाफिर एक हसीना,हमसाया,दिल और मोहब्बत,CID ९०९,एक बार मुस्कुरा दो असे चित्रपट केले।

१९४३ च्या राहगीर पासून शेवन रिझवी लिहीत होते। मग सुनहरे पल,सुरंग,लकीरे या काही चित्रपटांमधेही त्यांना संधी मिळाली।पण पहिल्यांदा त्यांचं खऱ्या अर्थानी नाव झालं ते एका क़व्वाली मुळे।ती कव्वाली 
आज ही मशहूर आहे. आणि असं म्हणतात,या कव्वाली मुळे कव्वाली या गीत प्रकाराला एक प्रकारचं नवीन आयुष्य मिळालं।बुलो सी रानी यांचं संगीत असलेली ती क़व्वाली अल-हीलाल(१९५८) चित्रपटातील आहे.…… 
हमें तो लूट लिया मिल के हुस्न वालो ने,काले काले बालो ने,गोरे गोरे गालो ने ( गायक--इस्माएल आज़ाद )

एक मुसाफिर एक हसींना मधे तर अप्रतिम लिहिलंय रिझवी यांनी।
निकले तेरी तलाश में और खुद ही खो गये 
कुछ बन पड़ी न हमसे तो दीवाने हो गये 
दीवानगी ने फिर तेरा कूचा दिखा दिया 
हम को तुम्हारे इश्क़ ने क्या क्या बना दिया 

भाई वाह,अंगावर काटा नाही आला तरच नवल.
एवढी छान शब्द संपदा आपल्या करता सोडून जाणाऱ्या या गीतकराला सलाम।
आणि दरवर्षी अशा प्रकारचे सुन्दर कार्यक्रम आयोजित करणाऱ्या SIRC अमरावती चे आभार। 

मनीष गोखले 
पुणे 
9822859270 
   

No comments: