Friday, July 31, 2015

 रफ़ी साहेबांचा शेवटचा दिवस--३१ जुलै १९८०

आज गुरुपूर्णिमा।गुरुपूर्णिमा हा आपल्या गुरुला वंदन करण्याचा दिवस।
नुसतं आपल्या संगीताने या सर्वांना मंत्र मुग्ध करणारेच नाहीत तर आपल्या संपूर्ण आयुष्यद्वारे तमाम जगाला मानवतेचा एक हळवा स्पर्श देणारे एक संत,अशी रफ़ी साहेबांची ओळख.आज त्यांची ३५ वी पुण्यतिथी।हा थोड़ासा प्रयत्न त्यांच्या आयुष्यातील शेवटच्या क्षणांमधे डोकवून पाहण्याच्या,त्यांना अजुन समजून घेण्याचा।

आपल्या नित्याप्रमाणे रफ़ी साहेब पहाटे उठले। साधारण सकाळी १० वाजता त्यांनी मशहूर बंगाली संगीतकार 
श्यामल मित्रा यांना आपल्या घरी बोलवलं होतं। काही दिवसातच येणाऱ्या दुर्गापूजेसाठी त्यांना आरत्या बसवायच्या होत्या. रफ़ी साहेब बैडमिंटन खेळून,आपला रियाज़ आटपून तयार होते. 

ठरल्या वेळेप्रमाणे श्यामल मित्रा आले. सुरवातीच्या चहापानानंतर संगीत सेवेला प्रारंभ झाला।रफ़ी साहेब 
मात्र थोड़े अस्वस्थ होते. एक दोन वेळा श्यामल मित्रांनी त्यांना तब्येती बद्दल विचारलं तेव्हा रफ़ी साहेबांनी आपला रियाज़ सुरु ठेवण्याबद्दल हरकत नसल्याचं सांगितलं पण काही वेळातच बेचैनी असह्य झाली।आणि रफ़ी साहेब मित्रांच्या परवानगीने थोड़ा आराम करायला आपल्या खोलीत गेले. रफ़ी साहेबांच्या घरच्या लोकांना  चिंता वाटायला  लागली। रफ़ी साहेबांचे मेव्हणे ज़हीर बारी यांनी फॅमिली डॉक्टरांना बोलवलं। त्यांना ह्रदयविकाराच्या झटक्याची आशंका आली.प्राथमिक तपासणी नंतर त्यांनी रफ़ी साहेबांना जवळच्या नेशनल हॉस्पिटल मधे नेण्यास सांगितलं।

बिल्क़िस बानो (रफींच्या पत्नी) यांनी श्यामल मित्रा यांना रफ़ी साहेबांच्या तब्बेतीची बातमी सांगितली व
दुसऱ्या दिवशी येण्यास सांगितलं।रफ़ी साहेब चालतच घराबाहेर पडले।आपल्या गाडीतून नेशनल हॉस्पिटल मधे गेले।

नेशनल हॉस्पिटल मधल्या डॉक्टरांनी रफ़ी साहेबांचा ECG केला।परिस्थितितीचे गांभीर्य लक्षात घेवून बॉम्बे हॉस्पिटल मधे नेण्यास सांगितलं।तो पर्यंत रफ़ी साहेबंच्या जवळच्या लोकांना थोड़ी खबर लागली होती.
आताशा रफींची तब्येत खालवायला लागली होती. ह्रदय आक्रोश करायला लागलं होतं।मनुष्याच्या हातून, आयुष्याचा प्रश्न देवाच्या दरबारी पोहोचला होता।

त्याही अवस्थेत रफ़ी साहेब मात्र अल्लाह ची माफ़ी मागत होते. त्यांच्या मनाला एक टोचणी लागली होती. श्यामल मित्रांना परत जावं लागलं,ही गोष्ट त्यांच्या मनातून जात नव्हती।या वरून रफ़ीसाहेबांच्या मनाची,त्यांच्या माणुसकीची कल्पना येते।साक्षात मृत्यू समोर असतानाही ते दुसऱ्याचाच विचार करत होते.

त्या पावसाळी वातावरणात बाहेर वादळ सुटलेलं होतं। रफ़ी साहेबांच्या हृदयात वीज चमकत होती।डॉक्टरांचे
प्रयत्न अपूरे पडत होते।शेवटी रात्री १० वाजून २५ मि नी आपल्या असंख्य गीतांना श्वास देणाऱ्या रफ़ी
साहेबांनी आपला अखेरचा श्वास घेतला।

डॉक्टरांना देखील हुंदका आवरत नव्हता।कारण रफ़ी साहेबांचं असं जाणं  म्हणजे सर्वांसाठी आपल्या वरची छत्रछाया निघून जाण्यासारखं होतं।

तो टीवी आणि इंटरनेट चा जमाना नसूनही ही बातमी वेड्यासारखी पसरली। असंख्य जीव हळहळले,करोडो डोळ्यांनी अश्रुंना वाट मोकळी करून दिली,हजारो पावलं मुंबईच्या दिशेनी वळली। या देवदूतावरच्या प्रेमानी
हे घडवलं होतं।

दुसऱ्या दिवशी १ ऑगस्ट ला,आतापर्यंतची(चित्रपट सृष्टीतील) सर्वात मोठी यात्रा निघाली। हळूहळू जूहू कब्रस्तानकडे रफ़ी साहेब आपल्यावर प्रेम करणाऱ्या लोकांसोबत निघाले होते. व संध्याकाळी चार वाजून पंचेचाळीस मि नी ते एकटेच पुढे गेले आणि धरती मातेच्या गर्भात विसावले।

आजही मी पाहतो,रफ़ी साहेबांचे नाव येताच लोक हळवे होतात.त्या हळव्या मनावर फुंकर घालण्यासाठी लोकांना पुन्हा रफ़ी नावाच्या स्वराचाच आधार घ्यावा लागतो।

नाही तरी रफ़ी साहेबांनीच म्हणून ठेवलय,

जी करता है जीते जी मै यु ही गाता जाउ
गर्दिश में थके हारो का माथा सहलाता जाऊ


रफ़ी साहेबांना विनम्र श्रद्धांजली।।।।


मनीष गोखले
पुणे
9822859270









रफ़ी साहेबांनी रिकॉर्ड केलेलं शेवटच गाणं

he recorded 4 line sher on 28th july 1980,3 days before his death

तेरे आने की आस है दोस्त
ये शाम फिर क्यों उदास है दोस्त
महकी महकी फ़िज़ा ये कहती है
तू कही आसपास है दोस्त

फिल्म--आसपास
संगीत --लक्ष्मी प्यारे
गीत --आनंद बक्शी 
रफ़ी साहेबांची १० सोलो गीते

१. मधुबन में राधिका नाचे रे --कोहिनूर (संगीत -नौशाद,गीतकार --शकील बदायुनी )
२. अहसान तेरा होगा मुझपर --जंगली (शंकर जयकिशन/हसरत जयपुरी)
३. खोया खोया चाँद --काला बाज़ार (सचिन देव बर्मन /शैलेंद्र)
४ मुझे दर्द ए दिल का पता न था --आकाश दीप (चित्रगुप्त/मजरूह )
५. ऐसे तो ना देखो --तीन देवियां (सचिन देव बर्मन/मजरूह)
६. चाहूंगा मै तुझे साँझ सवेरे--दोस्ती (लक्ष्मी-प्यारे/मजरूह)
७. तेरी प्यारी प्यारी सूरत को--ससुराल (शंकर जय किशन/हसरत)
८. फिर आनेलगा याद वोही -- ये दिल किसको दू(इक़बाल कुरैशी)
९. पुकारता चला हूँ मै --मेरे सनम (ओ पि नय्यर /मजरूह)
१०. बंदा परवर थाम लो जिगर--फिर वही दिल लाया हूँ (ओ पी नय्यर /मजरूह)

१० duets  of  रफ़ी साहब 

१)एक शहंशाह ने बनवा के हँसी ताज महल --लीडर (नौशाद/शकील )with Lata
२ )दीवाना हुवा बादल ---कश्मीर की कली --(ओ पी नय्यर/S.H.Bihaari)with asha
3)तुझे जीवन की डोर से --असली नक़ली (शंकर जयकिशन /हसरत)with lata
४)तेरी बिंदिया रे --अभिमान (सचिन देव बर्मन /मजरूह)with lata
५)सुन सुन सुन ज़ालिमा --आरपार (ओ पी नय्यर /मजरूह)with Geeta dutt
६) देखो रूठा न करो --तेरे घर के सामने (सचिन देव बर्मन/हसरत)with lata
६)जो वादा किया वो --ताजमहल (रोशन /साहिर)with lata
७)जीवन में पीया तेरा साथ रहे--गूंज उठी शहनाई (वसंत देसाई/भरत व्यास)with lata
८)झिलमिल सितारों का आँगन होगा--जीवन मृत्यु (लक्ष्मी प्यारे ,आनंद बक्शी )with lata
९)दो सितारों का जमीं पर --कोहिनूर (नौशाद/शकील)with lata
१०)आज कल तेरे मेरे प्यार के सपने --ब्रम्हचारी (शंकर जयकिशन/हसरत )with suman kalyan pur



Monday, July 27, 2015

मुद्दते हो गयी है देखो सिमटते सिमटते 
चलो हम आज ज़रा बिख़र के तो देखें
ज़र्रा ज़र्रा बन के कुछ आज़ाद हो जाये 
हर सू इस जहाँ से ज़रा गुज़र के तो देखें 
अब कोई आस नहीं है नयी उचाईयों की 
किसी दिल की गहरायी में उतर के तो देखें
थक से गये है जो ग़मों से बचते बचते  
कभी खुशियों से भी ज़रा मुकर के तो देखे
फ़िक्र अपने ही अश्क़ो की क्यों रहे हरदम 
कभी दर्द किसी और की नज़र के तो देखें 
दर ए खुदा पे सजदे,तो है रोज़ की कहानी
कभी बूढ़े मां बाप के कदमो में ठहर के तो देखें  

हर सू --हर तरफ़ 

@ मनिष गोखले...