न शौक ए वस्ल का दावा,ज़ौक़ ए आशनाई का
मै इक नाचीज़ बंदा और उसे दावा खुदाई का
वस्ल--मिलन ,ज़ौक़ --शौक
आशनाई-ओळख
मला मिलनाची इच्छाही नाही किंवा कुणाची ओळख करून घेण्याचा शौकही नाही।मी ईश्वरी भक्तीमधे रममाण होणारा एक साधा माणूस आहे.
कफ़स हु मगर सारा चमन आखो के आगे है
रिहाई के बराबर अब तसव्वुर अब है रिहाई का
कफ़स --तुरुंग
तसव्वुर --ख़याल
कैदेमधे किंवा तुरुंगात असूनही माझ्या नजरेत अजूनही बाहेरचं सगळं सुखी असलेलं जग डोळ्यासमोर आहे.
त्यामुळे सुटकेचा नुसता विचार देखील खरोखरच्या सुटके सारखाच आहे.
नया अफ़साना कहे वाइज़,तो शायद गर्म हो महफ़िल
क़यामत तो पुराना हाल है रोज़ ए जुदाई का
वाइज़ --धर्मोपदेशक
उपदेश कारणाऱ्यानी जर नवी काही कहाणी सांगितली,तर काही मजा आहे. नाही तर विरह म्हणजे प्रलय हा प्रकार तसा आता जुनाच झालाय।
बहार आई है अब अस्मत का पर्दा फाश होता है
जुनूँ का हाथ है आज और दामन पारसाई का
अस्मत --पावित्र्य,शील
पारसाई --संयम,निग्रह
प्रेमाचा मौसम आला संयमाच्या मर्यादा गळून पडतात।जणू वेडेपणानी एका निग्रहाला संपवायचंच ठरवलंय।